IPL 2026 | IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? ‘या’ एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही

IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? 'या' एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही <br/>

IPL 2026 | IPL 2026 मध्ये कोणत्या संघात किती महाराष्ट्राचे खेळाडू ? ‘या’ एका संघात एकही मराठमोळा खेळाडू नाही

आयपीएल 2026 रंगात आलं आहे. जुने खेळाडू आपला उच्च दर्जाचे खेळाडू आहेत हे दाखवत आहेत, तर नवीन खेळाडू त्यांचं टॅलेंट दाखवण्यात कसलीच कसर ठेवत नाहीयेत. वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, प्रफुल हिंगे, साकिब हुसेन, मुकुल चौधरी आणि इतर अनेक युवा खेळाडूंनी सगळ्यांना प्रभावित केलं आहे. देशभरातील अनेक खेळाडू आयपीलएलमध्ये खेळत आहेत, पण आयपीएलमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू खेळात आहेत ? कोणत्या संघांसाठी खेळत आहेत हे जाणून घेऊयात. 

हेही वाचा – Mumbai Indians | तिलक वर्माच्या आधी 'या' खेळाडूंनी मारलं मुंबईसाठी शतक; जाणून घ्या सचिन, रोहित यांच्यासह आणखी कोणाचा यादीत समावेश 
 

 1. चेन्नई सुपर किंग्स – 
चेन्नईच्या संघात ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, आयुष म्हात्रे, शिवम दुबे, अमन खान, रामकृष्ण घोष आणि मुकेश चौधरी हे महाराष्ट्राचे  खेळाडू खेळत आहेत. 

2. दिल्ली कॅपिटल्स –  
दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पृथ्वी शॉ आणि साहिल पारख हे दोघेच महाराष्ट्राचे खेळाडू खेळत आहेत.

3. कोलकाता नाईट रायडर्स – 
कोलकाताच्या संघाचा कर्णधारच मुळात मराठमोळा खेळाडू आहे. कोलकाताच्या संघात अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी, राहुल त्रिपाठी आणि प्रशांत सोळंकी हे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. 

हेही वाचा – Nitish Kumar Reddy | नितीश कुमार रेड्डीने रील बघून वाढवली गोलंदाजीची गती; 120 च्या गतीवरून थेट 140 वर उडी 

4. लखनऊ सुपर जायंट्स – 
लखनऊ सुपर जायंट्समध्ये दोन मराठमोळे खेळाडू आहेत. लखनऊच्या संघात अर्जुन तेंडुलकर आणि अर्शीन कुलकर्णी या दोन मराठमोळ्या खेळाडूंचा समावेश आहे. 

5. मुंबई इंडियन्स – 
मुंबईचा संघ आयपीएलमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. मुंबईच्या संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दानिश मालेवार आणि अथर्व अंकोलेकर हे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत, पण अथर्व अंकोलेकर दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला आहे त्याच्याजागी संघात क्रिश भगत याला समाविष्ट करण्यात आले आहे. 

6. पंजाब किंग्स – 
पंजाब किंग्सचा कर्णधार मुंबईचा श्रेयस अय्यर आहे. पंजाब संघात श्रेयस अय्यर, मुशीर खान, सुर्यांश शेडगे आणि यश ठाकूर हे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. 

7. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 
आरसीबीच्या संघात एक महाराष्ट्राचा खेळाडू आहे. जितेश शर्मा हा एकुलता एक महाराष्ट्राचा खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे तो आरसीबीचा उपकर्णधारदेखील आहे. जितेशच्या कारकिर्दीची सुरुवात विदर्भाकडून झाली होती. २०१४ ते २०२४ या काळात जितेश विदर्भासाठीखेळला, पण गेल्या वर्षीपासून त्याने बडोद्यासाठी खेळण्याचा निर्णय घेतला. 

8. राजस्थान रॉयल्स – 
यशस्वी जैस्वाल आणि तुषार देशपांडे हे दोघे राजस्थानच्या संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

9. सनरायजर्स हैद्राबाद – 
सनरायजर्स हैद्राबादमध्ये तीन  महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे. प्रफुल हिंगे, हर्ष दुबे आणि ओंकार तरमाळे हे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत.  

10. गुजरात टायटन्स – 
गुजरात टायटन्स दहा संघांमध्ये एकुलता एक संघ आहे ज्या संघात एकही महाराष्ट्राचा खेळाडू नाही आहे. 

चेन्नई सुपर किंग्समध्ये सर्वात जास्त 7 महाराष्ट्राचे खेळाडू आहेत, तर गुजरात टायटन्समध्ये एकही महाराष्ट्राचा खेळाडू नाही आहे. मुंबई, कोलकाता आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 4-4 महाराष्ट्राचे खेळाडू आहेत. सनरायजर्स हैद्राबादमध्ये तीन महाराष्ट्राचे खेळाडू आहेत, तर दिल्ली आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 2-2खेळाडू आहेत. आरसीबीमध्ये एकच महाराष्ट्राचा खेळाडू आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number